मोहम्मद कैफ या बालकाचा अमानुष खून केल्याप्रकरणी आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारता मालेगाव येथील न्यायालयात वकिलांनी फिर्यादीच्या बाजूने युक्तिवाद करत मानवतेचे वेगळे दर्शन घडवल्याबद्दल हिंदू मुस्लिम संघटनेच्या वतीने आज मालेगाव वकील संघाचे अभिनंदन व आभार व्यक्त करत वकील प्रोटेक्शन ॲक्टला समर्थन देण्यात आले.
यावेळी बोलताना निखिल पवार यांनी सांगितले की मालेगावच्या इतिहासात कौतुकास्पद नोंद घेण्यासारखी घटना वकील संघातर्फे घडली असून मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनांवर अंकुश आणण्यासाठी मालेगाव वकील संघाचे हे पाऊल आदर्श ठरेल. शहरातील व तालुक्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी व अशा अमानवी कृत्यांना चाप बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबर वकिलांचे योगदान फार महत्त्वाचे असून मालेगाव वकील संघाच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी नक्कीच मदत होत आहे. मालेगाव वकील संघाच्या या कृतीमुळे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे मनोगत कमी झाले आहे. वकील प्रोटेक्शनला हिंदू मुस्लिम एकता संघटना समर्थन देत आहे.
रामदास बोरसे यांनी सांगितले की घडलेली घटना अतिशय दुःखद होती परंतु मालेगाव वकील संघाने अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार व अभिनंदन व्यक्त करतो.
जमील अहमद क्रांती यांनी सांगितले की मालेगावात यापुढील काळात मानवतेला काळीमा फासणाऱ्या घडल्यावर त्या विरुद्ध जात धर्म न पाहता त्याला सर्व स्तरातून विरोध झाला पाहिजे. असाच पायंडा वकील संघाने कायम ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
ॲड नाविद अन्सारी यांनी सांगितले की सदर घटना अतिशय दुःखद होती. निराअसपराध पाच वर्षे वयाच्या बालकाचा अमानुष खून करून आलेल्या आरोपीला मालेगाव वकील संघाच्या कोणत्याच वकिलाने न्यायालयात मदत न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण गुन्हेगारी जगतावर त्याचा परिणाम होईल. समाजातील इतर घटकांनी देखील अशा अमानवीय कृत्यांचा कठोर असा विरोध केला पाहिजे. त्यांच्या विरोधात प्रकर्षाने आवाज उठवला पाहिजे. मालेगावात हिंदू मुस्लिम एकता नांदावी, शहरात भाईचारा वृंधदीगत व्हावा यासाठी हिंदू मुस्लिम एकता संघटना प्रयत्न करत आहे त्याला मालेगाव वकील संघ सहकार्य करेल.
मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड चंद्रशेखर देवरे यांनी सांगितले की हिंदू मुस्लिम एकता संघटनेचे कार्य मालेगाव शहरासाठी दिशादर्शक आहे. मालेगाव वकील संघ मोहम्मद कैफ आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. मालेगाव वकील संघ आपल्या कर्तव्य भावनेतून प्रामाणिक काम करत असून या निर्दयी दुःखद घटनेमुळे शोक व्यक्त करत असताना आम्ही सत्कार स्वीकारणारने योग्य नाही. हिंदू मुस्लिम एकता संघटना व मालेगाव वकील संघ एकत्र मिळून मालेगावात चांगल्या सकारात्मक गोष्टी घडवण्यासाठी प्रयत्न करीत राहू अशी ग्वाही दिली.
ॲड किशोर त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन केले व ज्युनियर प्रतिनिधी आर डी निकम यांनी आभार मानले.
हिंदू मुस्लिम एकता संघटनेचे रामदास बोरसे, जमील अहमद क्रांती, निखिल पवार, एखलाख बढे मुकादम, विवेक वारुळे, भरत पाटील, कैलास शर्मा, इम्तियाज कैसर, सोहेल डालरिया, प्रवीण चौधरी, दिपक पाटील, सुशांत कुलकर्णी, इनाम सर, करण भोसले, संदीप मोरे, अकील इशाक दिर, अंजुम हुसेन इंजि. मालेगाव वकील संघाचे सदस्य ॲड रमेश मोरे, ॲड निलेश बाफना, ॲड सचिन रावळ, ॲड के डी भामरे, ॲड संदीप हिरे, ॲड निलेश कुलकर्णी, ॲड निलेश पाटील, ॲड परिक्षीत पवार, ॲड हर्षल तिवारी, ॲड वासिफ, ॲड सी पी देवरे आदी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 تبصرے